महिन्यातील तीन आठवडे नागपूर प्रदूषितच!

0

प्रा सुरेश चोपणे
पर्यावरण अभ्यासक

नागपुरात 31 पैकी 21 दिवस प्रदूषण

वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम आणि थर्मल पॉवर स्टेशन ,इतर उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे अनेक जिल्ह्यात प्रदूषनात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.मागील काही वर्षांत प्रदूषणात अग्रेसर असलेल्या चंद्रपुर पेक्षाही नागपूर चे प्रदूषण वाढले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.

नागपूर सहित प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकाम, रस्ते बांधणे सुरू असते त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे.त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते.नागपूर शहरात सुद्धा अश्याच समस्या निर्माण होत असल्याने प्रदूषणात सतत वाढ होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.
ऑक्टोबर महिन्यात थंडी मुळे धूळ आणि धूर जमिनी जवळ येतो,त्यामूळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक(AQI)वाढतो. ऑक्टोबर 2023 महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केलेल्या आकडेवारी नुसार 31 पैकी 21 दिवस प्रदूषण आढळले.0-50 निर्देशांक चांगला(Good) मानल्या जातो.हा निर्देशांक इथे 1 दिवस होता. परंतु 51-100 निर्देशांक समाधान कारक (Satisfactory)किंवा साधारण प्रदूषित मानला जातो.इथे असे 9 दिवस होते.नागपूर मध्ये मात्र ह्यापेक्षा जास्त प्रदूषण आढळले. मागिल महिन्यात 31 पैकी 19 दिवस निर्देशांक 100-200 ह्या प्रदुशीत श्रेणीत (Moderate) होता तर 2 दिवस निर्देशांक 200-300 ह्या अति प्रदूषित (poor)श्रेणीत होता.

ह्या प्रदूषणामुळे आधिच श्वसनाच्या रोग्याला हानिकारक तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात.
हे प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे,शहरात सायकल चा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे,कचरा न इळणे ,उदयोगांणी प्रदूषण रोखणे , नागरिकांनी सुद्धा प्रदूषण होऊ नये अश्या उपाययोजना करणे ,प्रशासनाणे कडक अनेक उपाय योजना राबविण्यात आल्या तरच प्रदूषनावर नियंत्रण होऊ शकेल
——-

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा