
वर्धा WARDHA – वर्ध्यातील एका मेडिकलच्या औषध विक्रेत्याकडून सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकास दलालासह रंगेहात अटक करण्यात आली. NAGPUR नागपूर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून वर्ध्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकाने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी सात हजारांची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली.
वर्ध्यातील एका औषध विक्रेत्याकडे निरीक्षण करण्यासाठी औषध निरीक्षक Satish Harisingh Chavan सतीश हरिसिंग चव्हाण आला होता. दरम्यान निरीक्षणाचा अहवाल हा तक्रारदार असलेल्या औषध विक्रेत्याच्या बाजूने करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. वर्ध्याच्या केळकरवाडी येथील प्रवीण यादवराव पाथरकर या दलालाने सात हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. सापळा रचून असलेल्या पथकाने दलाल पाथरकर याला रंगेहात अटक केली. तर औषध निरीक्षक सतीश चव्हाण याला देखील लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. दोघांच्याही घराची झाडाझडती घेतली जात आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सुरू असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहात ही कारवाई झाल्याने सर्वांचे लक्ष या कारवाईकडे वेधले गेले आहे.
