बीडमधील घटना गृहविभागाचे अपयश-आमदार सोळंके

0

मुंबई- बीडमधील हिंसक घटना या गृहविभागाचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. आमदार सोळंके यांनी एक प्रकारे सरकारला घरचा अहेर दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलकांनी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे निवासस्थान तसेच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीला आग लावली होती. सोळंके यांच्या घराची जाळपोळ केल्यानंतर घराबाहेरील वाहनांना आगी लावल्या होत्या. (NCP MLA Prakash Solanke) 

हिंसक जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त अन्य जाती जमातीचे लोक होते. यासोबतच काळाबाजार करणारे लोक देखील होते.यामध्ये माझे गेल्या ३० वर्षापासूनचे राजकीय विरोधक त्याचबरोबर त्यांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक देखील होते. ३०० जणांच्या जमावामध्ये अनेकांकडे शस्त्रे होती. पेट्रोल बॉम्ब होते. हे लोक पूर्ण नियोजन करून माझ्यावर हल्ला करण्याच्या हेतूने आले होते, असा आरोपही त्यांनी केला. ही घटना गृहखात्याचे पूर्णपणे अपयश आहे. जाळपोळ होताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप आमदार सोळंके यांनी केला. घटनेच्या दिवशी मी घरीच होतो. माजलगाव बंद करण्यात आले होते. जमाव माझ्या घरावर येणार असल्याची माहिती मला काही युवकांनी दिली होती. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी तेथे थांबलो होतो, असे त्यांनी सांगितले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा