
जळगाव JALGAW -मराठा आरक्षण संदर्भात सुरुवातीच्या काळात सुप्रिम कोर्टात जाणीवपूर्वक मराठा आरक्षण संदर्भात विधेयक कमजोर व्हावं असाच प्रयत्न त्यांनी केला.घटनात्मक दुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावं असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.
आता तुम्ही सत्तेत आहेत ते आरक्षण जे आहे ते तुम्ही आरक्षण मिळवून दाखवा,उगाच इतरांना कशासाठी दोष देत आहात. केंद्राने यात हस्तक्षेप करून घटनात्मक दुरुस्ती करून मराठा आरक्षण द्यावं.मराठा आरक्षणाला न्याय देण्या संदर्भात गेल्या काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली होती व त्यांनी सांगितलं होतं की जर मी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर राजकीय संन्यास घेईन ,त्यामुळे अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावा .आज मुख्यमंत्री एकटे पडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार व्याधीग्रस्त आहेत त्यामुळे एकटे मुख्यमंत्री हा प्रश्न कसा सोडवू शकतात ?
मराठा समाजाचे शिष्टमंडळ भेटीला जात असेल मात्र ज्या ज्या वेळी संकटमोचक गिरीश महाजन हे भेटीला गेले आहेत ते फेल ठरले आहेत. विनाकारण शिष्टमंडळ बनून जायचं आणि नाटक करायचं.फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याबद्दल जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.शिष्ट मंडळ जरांगे पाटील यांच्याकडे कोणताही प्रस्ताव घेऊन गेले तरी तो प्रश्न सुटणार नाही
सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर विधानसभेत प्रस्ताव मंजूर करावा तो दिल्ली येथे घेऊन जाऊन घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण द्यावे.
उगाच दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आम्ही काय करतो आहे ते सांगा, विशेष अधिवेशन हे घेतलेच पाहिजे आणि त्यात हा प्रश्न सोडवला पाहिजे.
विधानसभा अध्यक्षांनी या पुढच्या तारखा द्यायच्या की मागच्या तारखेला द्यायच्या हे त्यांनी ठरवायचं,मात्र त्यांना आता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणांमध्ये हा ठोस निर्णय घ्यावाच लागेल असे एकनाथ खडसे म्हणाले