
मुंबई MUMBAI -मराठा समाजाला आरक्षण maratha aarakshan द्यावे आणि एकदिवशीय अधिवेशन घेण्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी मंत्रालयासमोर सर्वपक्षीय आमदारांनी केले. आमदारांनी आज मंत्रालयासमोर येत चक्काजाम आंदोलन केले. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी आमदारांना ताब्यात घेतलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बुधवारी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयास टाळे लावले होते. या आमदारांनी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, गुरुवारी आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहतूक मोकळी केली.
