सुप्रियाताईंच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटला-चित्रा वाघ

0

 

मुंबई- मराठा आरक्षणावरून आंदोलन सुरु असताना ते शांत करण्याऐवजी सुप्रिया सुळे ह्या वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करत असून यातून त्यांचा खोट्या माणुसकीचा बुरखा फाटल्याची घणाघाती टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे केली आहे. श्रीमती सुळे यांची कावेबाज ‘माणुसकी’ प्रत्यक्षात हिडीस आणि ओंगळ आहे. तुम्ही रक्ताची चटक लागलेल्या राजकारणी आहात की काय अशी शंका येत असल्याचे श्रीमती वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
श्रीमती वाघ यांनी म्हटले आहे की, श्रीमती सुळे यांना जळी,स्थळी,काष्ठी सर्वत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या व्यक्तींना सगळे पिवळे दिसते त्याप्रमाणे श्रीमती सुळे यांना देवेंद्रजींनी काहीही केले तरी त्यात वावगेच दिसते. सुप्रियाताई, हा आजार बरा नव्हे त्यामुळे लवकर उपचार घ्या असा खोचक सल्लाही श्रीमती वाघ यांनी दिला आहे.
वड्याचे तेल वांग्यावर ..या प्रमाणे सुप्रियाताई आपल्या भावाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राग देवेंद्रजींवर काढत असून त्याचा काहीच फायदा होणार नाही. या परिस्थितीत तुमचा चिडचिडेपणा का वाढलाय याचे कारण राज्यातील सूज्ञ जनतेला माहित आहे. सत्ताधारी आमदारांची कदापि तुम्ही चिंता करू नका त्यांचा ठाम विश्वास सरकारवर आहे .तुम्हीच तुमच्या आमदारांची काळजी करा कारण तुमच्याच पक्षातील आमदारांचा तुमच्यावर किती भरवसा आहे हे तुम्हाला कळून चुकले असेलच. ‘अर्श से फर्श’ अशी केविलवाणी स्थिती तुमची झाली असून याहून अधिक अधोगती ती काय असू शकते असा टोलाही श्रीमती वाघ यांनी मारला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा