या महिन्यात आकाशातही दिवाळी!

0

 

नागपूर NAGPUER – नोव्हेंबर महीन्यात भारतात प्रकाशांची उधळण करून दिवाळी साजरी केली जाते, तशीच विविध खगोलीय घटनांनी  Celestial phenomenon सुद्धा आकाशात सुध्दा जणू दिपावली साजरी होणार आहे. ह्या खगोलीय घटनांत गुरू पृथ्वी जवळ येत असून तेजस्वी दिसणार आहे, त्याचप्रमाणे पहाटे शुक्र अधिक तेजस्वी दिसेल. चंद्राची शुक्र, शनी आणि बुध ग्रहासोबत युती दिसणार आहे. दोन उल्कावर्षाव आणि धुमकेतू सुध्दा दिसणार असल्याने एकप्रकारे आकाशात सुध्दा दिवाळी साजरी होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच गृप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे  Astronomer and President of Sky Watch Group Prof. Suresh Chopane ह्यानी दिली.

चोपणे यांनी माहिती दिली की, ३ नोव्हेंबरला गुरू पृथ्वी जवळ येत असून संपूर्ण महिन्यात पूर्वेला संध्याकाळी साध्या डोळ्याने सर्वाधिक तेजस्वी दिसणार आहे. गुरु च्या जवळ येण्याला Jupiter’s Apposition असे म्हणतात. गुरु ग्रह केवळ एक आठवडा अतिशय तेजस्वी दिसणार असला तरी हिवाळ्यात रात्रभर बऱ्यापैकी तेजस्वी दिसेल. ९ तारखेला पहाटे पूर्वेला शुक्र – चंद्राची युती दिसेल. युरोप मधून शुक्राचे पिधान दिसणार आहे, ह्यावेळी चंद्रामुळे शुक्र संपूर्ण झाकला जाईल. भारतातून मात्र पिधान दिसणार नाही .केवळ ही अगदी जवळची युती पाहण्याची दुर्मिळ संधी आहे. १० नोव्हेंबरला C/2023-H2 (Lemon) हा धुमकेतू पृथ्वी जवळ येणार असून तो साध्या द्विनेत्रीं किंवा दुर्बिणीने दिसणार आहे. तो पृथ्वीपासून केवळ ०.१९ खगोलीय एकक AU अंतरावर हरकुलस तारा सामुहाजवळ दिसेल.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विशेषता १० तारखेला वृषभ राशीत साउथ टोरीड उल्कावर्षाव टोरीस तारासामुहा जवळ दिसेल. तर १३ तारखेला रात्री नॉर्थ टोरीड उल्कावर्षाव दिसेल . उत्तर टोरीड उल्कावर्षाव एका लघु ग्रहापासून तर दक्षिण टोरीड उल्कावर्षाव एकने धुमकेतुपासून तयार झाला आहे.

१३ तारखेला युरेनस ग्रह पृथ्वीजवळ (Apposition) येणार असून तो साध्या डोळ्याने दिसण्याची संधी आहे. दिवाळीच्या अमावास्येच्या रात्री हा ग्रह साध्या डोळ्याने गुरु ग्रहा जवळच दिसणार आहे. १४ नोव्हेंबरला संध्याकाळी सूर्य मावळताच चंद्र आणि बुध सोबतच मंगळ ग्रहाची युती दिसेल. सूर्य जवळ असल्याने आणि युती क्षितिजा जवळ असल्याने बारकाईने पाहिल्यास ही युती तूळ आणि वृचीक राशी दरम्यान दिसेल. विशेष म्हणजे बुध ग्रहाच्या जवळ मंगळ ग्रह सुद्धा पाहण्याची संधी आहे. १७,१८ तारखेला रात्री पूर्वे दिशेला सिंह राशीत लोकप्रिय लिओनीड उल्कावर्षाव पहावयास मिळेल. ताशी २० उल्का दिसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २० नोव्हेंबरला संध्याकाळी चंद्र आणि शनिची युती दिसेल. शहराच्या बाहेर जावून अंधाऱ्या रात्रीला शनीची कडा सुद्धा पाहता येईल. २५ नोव्हेंबरला संध्याकाळी चंद्र आणी गुरु ग्रहाची युती पहायला मिळेल.चंद्र ह्यावेळी पृथ्वीच्या जवळ असेल. २७ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा ( कृतिका तारासामुहात चंद्र असेल ) असून चंद्र तेजस्वी दिसेल. २८ नोव्हेंबरला पहाटे शुक्र ग्रह पृथ्वी च्या जवळ येत असल्याने अतिशय तेजस्वी ( -४.२१) दिसणार आहे. वरील सर्व खगोलीय घटना एकाच नोव्हेंबर महिन्यात दिसत असल्याने खरोखरच अवकाशात जणू दिवाळी साजरी होणार आहे. ह्या सुवर्ण संधीचा फायदा खगोल अभ्यासक, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रा. सुरेश चोपणे ह्यानी केले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा