रायगडमध्ये कंपनीला आग, ११ कामगार अडकल्याची भीती

0

रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील रसायन कंपनीत भीषण आग लागली असून या आगीत ११ कामगार अडकल्याची माहिती आहे. पाच कामगारांना चिंताजनक अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. गॅस गळतीमुळे (Gas leakage) आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळी अकरा वाजताच्या सुमारास आग लागली. ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगडमधील महाड एमआयडीसीमध्ये आहे. या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरु झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरू लागली. यामध्ये कंपनीतील ११ कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही दाखल झाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा