बिग बॉग ओटीटी विजेता एल्विस यादववर गुन्हा

0

नवी दिल्ली: ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता एल्विश यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एल्विशसह पाच आरोपींवर नोएडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सामाजिक कार्यकर्त्या व खासदार मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. त्यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली. एनसीआरमध्ये त्याने विषारी सापांचे विष पुरविणारी ड्रग पार्टी आयोजित केली होती, असा त्याच्यावर आरोप आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा