मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा द्या; सकल मराठा समाजाची मागणी

0

 

धुळे Dhule : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणास बसले होते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी त्यांचे हे आंदोलन सुरू होते तसेच त्यांनी मागील महिन्यात देखील आपल्या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते मात्र राज्य शासनाने मुदत मागितल्यानंतर 40 दिवसांचे अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला दिले होते.राज्य शासनाने 40 दिवस उलटून देखील मराठा आरक्षणाबाबत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने त्यांनी पुन्हा राज्य सरकार विरोधात आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपस्थित होते काल अखेर राज्य शासनाच्या मध्यस्थीनंतर मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने पुन्हा 2 जानेवारी पर्यंत मुदत मागितल्याने पुन्हा आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या संघर्ष योद्धा असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठा आंदोलकांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा