
गोंदिया – गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनीने या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गोंदिया-हैदराबाद- तिरुपती प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. ही विमान वाहतूक सुरू झाल्याने जिल्हावासीयांना दिवाळीची भेट मिळाली असून, प्रवाशांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी आमदार राजू जैन यांनी दिली.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा