
नागपूर NAGPUR –राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. त्यानिमित्याने भाजपाचे प्रवक्ता माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. ठिकठिकाणी जाहीर सभा आणि बैठकींच्या माध्यमातून ते प्रचंड जनसंपर्क साधत आहेत.
डॉ. देशमुख यांनी दि. ०२ नोव्हेंबर २०२३ ला पचखेडी (गां), ता. कुही येथे युवाक्रांती जनकल्याण परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार विवेक मेश्राम व इतर सदस्यांच्या प्रचारार्थ, वेलतूर, ता. कुही येथे ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार ग्यानीवंत साखरखेडे व इतर सदस्यांच्या प्रचारार्थ आणि शितलवाडी, ता. रामटेक येथे ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. नेहाताई कुमरे (गावंडे) व इतर सदस्यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा घेतल्या. भाजपा समर्थित पॅनल आणि उमेदवारांना निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार श्री. सुधीर पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी तसेच अनेक मान्यवर नेतेमंडळी उपस्थित होते. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा समर्थित पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार आणि इतर सदस्यांना निवडून दिल्यास भाजपाचे विकासात्मक कार्य आणखी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचेल आणि भाजपाच्या लोकहितार्थ योजनांचा लाभ सर्व जनतेला मिळेल. तेव्हा या उमेदवारांना मोठ्या मतांनी विजयी करा, असे आवाहन डॉ. आशिष देशमुख यांनी केले. जाहीर सभांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
