
पुणे, महाराष्ट्र:- दिंनाक.२९ ऑक्टोबर.२०२३ आज महा एनजीओ फेडरेशन जिल्हा समन्वयक नियुक्ती प्रदान व स्नेह मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनात महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यातील ५५ जिल्हा समन्वयक उपस्थित होते आणि, ह्या कार्यक्रमात सर्व जिल्हा समन्वयकांना त्यांच्या जबाबदारीसाठी नियुक्ती पत्र व्हिजीटिंग कार्ड आणिआयडी देण्यात आले.
संस्थापक श्री शेखर भाऊ मुंदडा यांनी सर्व समन्वयक यांना महा एनजीओ फेडरेशन मार्फत जिल्हा समन्वयक याचे ध्येय व उद्दिष्ट्ये त्याचबरोबर समाजात कोणत्या पद्धतीने महा एनजीओ फेडरेशनची वाटचाल असली पाहिजे यावर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोगा ७ जी म्हणजे गो संगोपन, गो संरक्षण, गो संवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गो मूल्यवर्धन व गो आधारित शेती बाबत पण माहिती दिली. सुरुवातीला महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी सर्व जिल्हा समन्वयकांचे अभिनंदन करुन प्रस्तावना करत मार्गदर्शन केले तर गणेश बाकले यांनी महा एनजीओ फेडरेशन बाबत मार्गदर्शन केले. अक्षय महाराज भोसले यांनी शासकीय योजना तळागाळापर्यंत कसे पोहचवता येतील यावर मार्गदर्शन केले. योगेश बजाज यांनी समन्वय साधला व मुकुंद आण्णा शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले.

यावेळी एनजीओ फेडरेशन संस्थापक श्री. शेखर मुंदडा, (अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग) वरीष्ठ संचालक श्री. मुकुंद शिंदे, संचालक श्री. अमोल उंबरजे, श्री. योगेश बजाज, श्री. अक्षय महाराज भोसले व श्री. गणेश बाकले उपस्थित होते.
सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी राहुल जगताप, अपूर्वा करवा, स्वप्निल पोफळे व विठ्ठल काळे यांनी परिश्रम घेतले आहे.
नविन निवड झालेले समन्वयक यांची नावे: सुरज सूर्यवंशी अहमदनगर; प्रसन्न धुमाळ अहमदनगर; रामपाल पांडे अहमदनगर; अवधूत कुलकर्णी अहमदनगर; डॉ. गिरीश कुलकर्णी अहमदनगर; तुषार हांडे अकोला; प्रतिभा पाटील अकोला; बंडू आंबटकर अमरावती; माधुरी चव्हाण अमरावती; प्रल्हाद कुटे बीड; बाजीराव ढाकणे बीड; दिलीप बिसेन भंडारा; सुनंदा नेवारे भंडारा; महेंद्र सोभागे बुलढाणा; शिला मोहोळ बुलढाणा; हरीशचंद्र पाल चंद्रपूर; किशोर चौधरी चंद्रपूर; सुहास न्यायाधिश, छत्रपती संभाजीनगर; अतुल धातबले छत्रपती संभाजीनगर; गीता कपूरे छत्रपती संभाजीनगर; तानाजी जाधव धाराशिव; संजीव आगळे धाराशिव; मीना भोसले धुळे; दिलीप माळी धुळे; अखिल शेख गडचिरोली; विक्रांत इंगळे गोंदिया; खंडू आढाव हिंगोली; अमोल गोबाडे हिंगोली; हर्षाली चौधरी जळगाव; पलाश मंडलेचा जळगाव; मुरली सुरसे जालना; लक्ष्मण मदन जालना; अशोक पोतनीस कोल्हापूर; ऐश्वर्या मुनीश्वर कोल्हापूर; डॉ. विजय राठी लातूर; अॅड. महिवीर (कपिल)पोकर्णा लातूर; चंद्रकला भार्गव लातूर; गुलाब चांडक मुंबई; दीपक कलिंगण मुंबई; संध्या भोयर नागपूर; शेखर जनबंधू नागपूर; दिनेश वाघमारे नागपूर; अभय आलोडे नागपूर; डॉ गणपतराव जिरोणेकर, नांदेड; लोकेश सातोरे नांदेड; डॉ उत्कर्ष राणे नंदुरबार; शेख शब्बीर मन्सुरी नंदुरबार; डॉ.भालचंद्र ठाकरे नाशिक; नलिनी सोनवणे नाशिक; डॉ. उल्हास कुटे नाशिक; यती राऊत मुंबई पालघर; परमेश्वर स्वामी परभणी; विनोद डावरे परभणी; सागर पाटील पुणे; डॉ. मिलिंद भोसुरे पुणे; चेतन मराठे पुणे; वीणा दीक्षित पुणे; प्रशांत वर्मा मुंबई; दिपाली देशमुख सातारा; मनोज विधाते सातारा; महेश कासट सोलापूर; डॉ.मनोज देवकर सोलापूर; जया शेंडे वर्धा; अमर पोटफोडे वर्धा; शहनाज फारुख बेनिवाल वाशीम; डॉ संजय रोठे वाशीम; राजकुमार भगत यवतमाळ; इरफान शेख यवतमाळ.