प्रहारवर कोणीही दबाव आणू शकत नाही – आ बच्चू कडू

0

 

अमरावती – मध्यप्रदेश निवडणूक संदर्भात भाजपने आ बच्चू कडूंना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे प्रहारने मध्य प्रदेशात स्वतंत्र उमेदवार उभा केला.भाजपने मिटींगला बोलावलं म्हणजे आम्ही त्यांचे गुलाम झालो नाही.आमची जिथे ताकद आहे, तिथे त्यांनी आम्हाला विचारणा केलीच पाहिजे. बच्चू कडू आता चार-पाच राज्यात लोकसभा प्रहारच्या नावावर निवडणूक लढवणार आहे.प्रहारवर कुणाचाही दबाव येऊ शकत नाही. प्रहारचा कुणावरही दबाव होऊ शकतो. आम्हाला प्रहार संघटना वाढवायची आहे असेही बच्चू कडू म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा