मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे उपोषण

0

 

अमरावती AMRAWATI – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. या उपोषणाच्या अगोदर सरकारला 40 दिवसांची मुदत दिली असतांनाही सरकारने मराठा आरक्षणासाठी कोणत्या प्रकारचे काम केले नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले होते. सरकारने पुन्हा त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला असताना जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्याचा वेळ दिला आणि काल जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले असतानाही जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मराठा समाज बांधवांनी एकदिवसीय उपोषण केले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा