खासगी बसगाड्यांसाठी कठोर नियम लागू होणार

0

नागपूर: खासगी बसगाड्यांचे वाढते अपघात लक्षात घेऊन रा्जय परिवहन विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्येही सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येणार आहे. (Maharashtra State Transport) प्रवाशांनी आपात्कालीन परिस्थितीत काय करावं याची सूचना प्रवाशांना देणे खाजगी बस संचालकांनाही बंधनकारक करण्यात येणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणखी काही महत्वाचे निर्णय आरटीओ ने घेतले आहेत. त्यात बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती स्टिकर स्वरूपात लावणे बंधनकारक राहणार आहे. त्याचप्रमाणे आपात्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे याच्या सूचना प्रवाशांना देण्यात येतील.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा