दिवाळी तेजोमय करणारे आकर्षक ‘कंदील’ बाजारात दाखल

0

 

नागपूर – दिवाळीचा तेजोमय सण अगदी काही दिवसांवर आला आहे. हिंदू परंपरेत दिवाळीच्या दिवसांत मोठी खरेदी केली जात असते. त्यातच प्रामुख्याने प्रकाशमय वस्तू खरेदी केल्या जातात. यातीलच एक मुख्य म्हणजे रंगीबेरंगी नक्षीकाम असलेले आकाश कंदील. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवाळीत बाजारात आकर्षक आकाश कंदील दाखल झाले आहेत. पारंपारिक तसेत विविध स्वरुपात बनवलेले कंदील ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. छोट्यापासून मोठ्या आकाराचे सुंदर कंदील विक्रीस उपलब्ध झाले आहेत, जे खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा