
गोंदिया GONDIYA – जिल्ह्यातील देवरी नगरपंचायत Deori Nagar Panchayat अंतर्गत सन 2018-19 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले होते. या योजनेकरिता लाभार्थ्यांना दोन लाख 50 हजार एवढे अनुदान मंजूर करण्यात आले होते. परंतु देवरी येथील अनेक नागरिकांना शेवटचा हप्ता न मिळाल्याने नाराज झालेल्या एका नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे घराची विक्री करण्याच नगर पंचायतला मागणी केली आहे. त्यामुळे नगरपंचायत मध्ये एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले आहे.Pradhan Mantri Awas Yojana
देवरी नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मध्ये लाभार्थी चंद्रकांत केशवराव लांडेकर यांनी वारंवार देवरी नगरपंचायतीकडे सेवांचा हप्ता मिळावा म्हणून वारंवार मागणी केली. त्यामुळे नगरपंचायतमध्ये एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. देवरी नगरपंचायत अंतर्गत 546 DPR अंतर्गत 260 लाभार्थ्यांची घरे झुडपी जंगल क्षेत्रात असून देवरी शहरात 288 लाभार्थ्यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र ठरले, त्यापैकी 178 लोकांची कामे पूर्ण झाली असून त्यांना शेवटचा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उसनवारीची अनेक लोकांकडून मागणी केली आणि ते लोक आता पैशासाठी तगादा लावत असल्याने लाभार्थी चंद्रकांत लांडेकर यांच्याकडे चक्क घर विकण्याची परवानगी मागितली.याविषयी देवरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी सांगितले की, शासनाच्या नियमाप्रमाणे मंजूर झालेल्या घरकुलांपैकी 90% घरकुल पूर्णत्वास आले नसल्याने शेवटचा हप्ता शासनाने थांबविला. त्यामुळे नगरपंचायतीचा यामध्ये कोणताही दोष नाही.
