गरीबांना आणखी ५ वर्ष मोफत रेशन, मोदींची घोषणा

0

नवी दिल्ली NEWS DELHI  : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे आता देशातील ८० कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार आहे. (Free Ration Scheme) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ही घटना केली असून देशातील गरीब जनतेला हे दिवाळीचे गिफ्ट असल्याचे मानले जात आहे.
छत्तीसगडमध्ये एक जाहीरसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली.केंद्र सरकारने कोव्हीड परिस्थितीनंतर २०२० मध्ये या योजनेची घोषणा केली होती. तेव्हापासून या योजनेला सातत्याने मुदतवाढ दिली जात आहे. आता मोदी यांनी ही योजना आणखी पाच वर्षे लागू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत सुमारे पावणेदोन लाख कोटी रुपयांचा खर्च येतो.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा