
नागपूर NAGPUR – तुम्ही ड्रग्ज प्रकरणात कारवाई करत आहात तरी दर दिवसाला अंमली पदार्थाचे कारखाने का उघडले जात आहेत? आजही गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सूरू असून हप्ता मंत्र्यापर्यंत जातो असा आरोप विधानसभा विरोधी पक्षात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महिलांबद्दल अवमानकारक भाषा वापरत होता तो थेट मुख्यमंत्र्यांचे घरी गणपतीला आरतीसाठी कसा जातो, तो सेलिब्रिटी असला तरी त्याचा पूर्वेतिहास तपासण्याची जबाबदारी गृह विभागाची असून याचे पुरावे आमच्याकडे आहेत असेही ठणकावले. Vijay Vadettiwar
काल परवा मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर आरती त्याने केली. या व्यक्तीने महिलेचा छळ केला, विषारी सापाचे तो विष तयार करतो, याची माहिती गृहखात्याला नाही का? राज्यात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सूरू आहे. याचा हप्ता मंत्र्यापर्यंत जातो, पोलीस हप्ता घेतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री ड्रग्ज संदर्भात मोठी कारवाई करतो म्हणत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. चार जाती ओबीसी मध्ये होत्या. त्यावेळी 31 टक्के मराठा दाखवले, 1967 पासून तुमच्याकडे दाखले असतील, तरच तुम्हाला मागास दाखवता येते अन्यथा ते पुन्हा कोर्टात टिकणार नाही. दुसरे म्हणजे सरसकट संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. भाजप सांगते की, आमचे रक्त ओबीसी आहे. त्यामुळे तुमचे डीएनए कोणते आहे? हे सांगण्याची आता वेळ आहे. दरम्यान,सरकारमध्ये असून सरकार विरोधात आंदोलन करणे हा प्रकार डबल ढोलकीचा आहे असे टीकास्त्र सोडले. सरकारमधून बाहेर पडून आंदोलन करावे. मनोज जरांगे यांना सुरक्षा देण्याची मागणी केली गेली आहे यासंदर्भात छेडले असता कोणाला काय सुरक्षा द्यावी? हा सरकारचा प्रश्न आहे, नाहीतरी गुजरात,गोहाटी गेलेल्या आमदारांना सुरक्षा दिलेलीच असल्याची टीका
वडेट्टीवार यांनी केली.
