ICC World Cup 2023 हार्दिक पांड्या स्पर्धेबाहेर, प्रसिद्ध कृष्णाचा समावेश

0

मुंबई-टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दीक पांड्या Hardik Pandya अद्यापही अनफिट असल्याने त्याला वर्ल्ड कपच्या इतर सामन्यांमधूनही वगळण्यात आले आहे. त्याच्याऐवजी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा PRASIDH KRUSHNA  याला स्थान देण्यात आले आहे. (ICC World Cup 2023) विश्व चषकाच्या उर्वरित सामन्यांसाठी तो उपलब्ध असणार आहे.
हार्दिक संघाबाहेर राहिल्यास त्याच्या जागी एखादा अष्टपैलू खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून परवानगी मिळाल्यानंतर या अननुभवी वेगवान गोलंदाजाचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला. प्रसिद्ध कृष्णानं टीम इंडियाकडून १७ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर २९ विकेट्स आहेत. २७ सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाकडून तो शेवटचा वनडे सामना खेळला होता.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा