ते पोलिस होणार बडतर्फ ! देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

0

नागपूर NAGPUR  : ड्रग्स फ्री महाराष्ट्र  Drug Free Maharashtra करण्यासाठी महाराष्ट्र  MAHARASHTRA शासन गंभीरपणे काम करत आहे. ही मोठी लढाई असून यात सर्वपक्षीयांचे सहकार्य अपेक्षित आहे. या व्यवसायात जे- जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ज्या लोकांनी अंमली पदार्थाच्या फॅक्टरी टाकून इतरांना जहर देण्याचे काम केले त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

ज्या पोलिसांनी हा सर्व धंदा सुरू राहू दिला त्यांच्यावर केवळ निलंबनच नाही तर बडतर्फीची कारवाई केली जाईल असे आज माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बजावले आहे. राज्यात पुराव्यांशिवाय राजकीय लोकांनी कुणावरही आरोप करू नयेत, असा सबुरीचा सल्ला विरोधकांना दिला आहे ललित पाटील प्रकरणात केले गेलेले आरोप इकडून तिकडून फिरून शेवटी त्यांच्याजवळच पोहोचले हे आपण बघितलेले आहे. राजकीय आरोप करणाऱ्यांनी गांभीर्याने ते केले पाहिजेत.

सार्वजनिक जीवनात कोणालाही बदनाम करण्याची गरज नाही. गणेशोत्सवामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात. यात अनेक सेलिब्रिटी असतात. मुख्यमंत्र्यांकडे एल्विस येऊन गेला तेव्हा रियालिटी शो जिंकलेला असल्यामुळे सेलिब्रिटी होता. यात उगीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना टार्गेट करण्याचे काहीच कारण नाही. असेच आरोप जर झाले तर राज्यातल्या अनेक पुढाऱ्यांना अटक होऊ शकते.उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा हे वैफल्यग्रस्त झाल्यामुळे असे बोलत असल्याचे आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा