
नागपूर – ग्रामीण भागात निवडणूक वारे कॉंग्रेस-महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. ८० टक्के ग्रामपंचायतीवर मविआचा विजय झालेला दिसेल असा दावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरातील ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. एल्विश यादव संदर्भात छेडले असता गणेश उत्सवात सेलिब्रिटींना बोलावून आरती करण्याचे पहिल्यांदाच पाहिले. वर्षावर जाण्यापूर्वी देखील एल्विश यादववर महिलांबाबत घृणास्पद बोलण्याचे आरोप होते याकडे लक्ष वेधले. 80 percent Gram Panchayat will see the victory of Mavia – Vijay Vadettiwar
अजित पवार यांच्या आईचे स्वप्न

प्रत्येक आईचे स्वप्न असतेच. ते स्वप्न कसे आणि कोण पूर्ण करणार? जे पूर्ण करणार ते सध्या दूरपर्यंत दिसत नाही, राज्यात सत्ता परिवर्तन होणार, अजित पवारांसाठी आई म्हणून त्यांच्या भावना योग्य आहेत. नागपूर आराखडा बाबतीत भाजप सरकार 9 वर्षात मोठा पूर आल्यावर आराखडा तयार करीत आहेत. निवडणूक तोंडावर असताना या आराखड्याला काही महत्व नाही. 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून राज्यातील जनतेवर सरकारने अन्याय केला आहे. चेहरे बघून घोषणा केली. मविआच्या काळात 9600 पर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता. आता तो दर का मिळत नाही? सोयाबीनला 2000 हजार रुपये क्विंटल द्यावा, कापसाला 3 हजार अनुदान द्यावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
नीलम गोऱ्हे यांच्या भूमिकेबाबत बोलताना ज्यांच्या निष्ठेवरच प्रश्न आहे, त्यांच्याविषयी काय बोलायच असे उत्तर दिले.
आरक्षण संबंधात कायद्याच्या चौकटीत जे बसेल, ओबीसीचे नुकसान कसं भरून काढणार? 32 टक्के मराठा लोकसंख्या यापूर्वी दाखवली. हे सगळे ओबीसीमध्ये होते. पुन्हा नव्याने प्रमाणपत्र देत आहे, सरकारला याचा जाब विचारला जाईल.संख्या वाढवली जात आहे. पण आरक्षण वाढत नाही. लोकसंख्या बघता अन्याय आहे. मराठा समाजाला देत असताना सगळीकडे बघायला पाहिजे. पाहिले मागास ठरवले पाहिजे, आरक्षण संपवण्याचा तर हा घाट नाही ना सरकारचा? निवडणुकीमुळे कांद्याचे भाव कमी केले होते यावर विजय वडेट्टीवार यांनी भर दिला.