18 ग्रामपंचायतींचा बहिष्कार कायम मतदान प्रक्रिया रद्द

0

 

बीड  BEED – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी  GRAMPANCHYAT  निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायत साठी मतदान होत असताना या 18 गावांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय येथे नऊ सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभाग होणार नसल्याचा ग्रामस्थांनी निर्धार केल्याची माहिती आहे अनिल मकाळ, माजी सरपंच यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा