सीताबर्डीत दुकानाला आग बाजारात गर्दी असल्याने तारांबळ

0

नागपूर NAGPUR  –नागपूरच्या सीताबर्डी मार्केट परिसरात आज एका दुकानाला आग लागल्याने खळबळ उडाली.
संगम पतंग नावाच्या इमारतीला ही आग लागल्याची घटना घडली. दिवाळीच्या खरेदीसाठी आजचा रविवार असल्याने यावेळी सीताबर्डी मेन रोडवर तुफान गर्दी झालेली असताना या आगीच्या घटनेने खूप धावपळ उडाली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वर्दळीच्या भागात ही आग लागल्याने या गाड्याना देखील वाट काढताना उशीर झाला.अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून पतंगाचा मोठा साठा असल्याने ही आग बराचवेळ धुमसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा