
महाराष्ट्रातील लोकसभा आणि निवडणुकीची आज पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे. कारण राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूक पार पडतेय. आज या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. राज्यातील 2 हजार 500 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होतेय. 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान होतंय. तर या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निडणुकीची झलक या ग्रामपंचायत निवडणुकीचत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आज नागरिकांची मतं आज मतपेटीत बंद होतील. तर उद्या निकाल सर्वांसमोर असेल
ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी
ठाणे- ग्रामपंचायत निवडणूकासाठी. सकाळपासून मतदानला मतदारांची गर्दी दिसली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सकाळी मतदारांची टक्केवारी कमी असली तरी दुपारनंतर ही वाढण्याची शक्यता आहे.मतदारांनी मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करावे व आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

१५१ ग्रामपंचायतीत मतदान
सोलापूर – सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत जिल्ह्यातील १०१ ग्रामपंचायतीत ९५६ जागांसाठी तसेच पोटनिवडणूक अंतर्गत ५० ग्रामपंचायतीत ५२ जागांसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातील ४८३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरु झाली असून सर्वच केंद्रांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठमध्ये सकाळपासूनच मतदारांनी उत्स्फूर्तपणे रांगा लावून मतदानाचा हक्क बजावल्याच चित्र दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे हे मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यात आहेत.
धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी
धुळे – जिल्ह्यात 31 ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातील 31 पैकी पाच ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूका झाल्या आहेत, उर्वरित 26 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडत असून मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. शिंदखेडा तालुक्यातील वाडी शेवाडी येथे देखील मतदारांची गर्दी वाढू लागली असून महिलांची संख्या सर्वाधिक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. वाडी शेवाडी हे गाव वाडी धरणात विस्थापित झालेले गाव असून गावातील नागरिकांचे पुनर्वसन तसेच गावातील तरुणांसाठी उद्योग उभारणे यासह शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सरपंच उमेदवार सुवर्णसिंग राजपूत यांनी सांगितले.