
गोंदिया- मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मागणी करीत आहेत. एकीकडे मराठा समाजाचा एक मोठा गट मराठ्यांना सरसकट वेगळा आरक्षणासाठी मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळावे व पण ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये, त्याचप्रमाणे धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावे परंतु अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका त्यांनी घेतली. There will be no time for Jarangs to go on hunger strike again, the government will give reservation that will last – Sunil Tatkare
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा बरोबरच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा अभूतपूर्व यश मिळवले यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेला जो निर्णय होता, तो आज लोकांनी सार्थ ठरवला आहे. बारामतीत बाराच्या बाराही जागा अजित पवार गटाने काबीज केल्या. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की. अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून आम्ही अजित पवारांसोबत आहोत, हे दाखवण्यासाठी बारामतीकरांनी हा कौल दिला. दरम्यान,मनोज जरांगे पाटील हे एक तारखेपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत आणि मराठ्यांशी संवाद साधणार आहेत. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, त्यांना आंदोलन करण्याची किंवा उपोषण करण्याची आता वेळच येणार नाही. महाराष्ट्रातील महायुती सरकार हे मराठ्यांना सर्वत्र टिकेल असे आरक्षण देणार आहे.
