वणी तालुक्यातील शिंदोला येथे शिवसेना ठाकरे गटाचे रास्तारोको आंदोलन

0

 

यवतमाळ YAWATMAL – शेतकर्‍यांचे प्रश्‍न शासनदरबारी प्रलंबित आहेत, पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, अतिवृष्टीची मदत मिळाली नाही, शेतकर्‍यांच्या मालाला भाव नाही, कोळसा वाहतुकीमुळे पिकांचे नुकसान होत आहे, कृषी विभागाने नवीन जीआर काढून मदत दिली पाहिजे, शेतकर्‍यांच्या कापूस, सोयाबीन पिकांना भाव नाही, हमी भावापेक्षा दीडपट भाव देण्याच्या मागणीसाठी वणी तालुक्यातील शिंदोला येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. टायर जाळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दिवाळी तोंडावर आली असताना सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याची माहिती माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर, यवतमाळ जिल्हा प्रमुख, उबाठा गट यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा