
मुंबई- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याने यासंदर्भात कोणीही संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिल्याचे मानले जात आहे. कश्मीरमधील कुपवाडा येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. भुजबळांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही.
