पतीला जाळून मारणाऱ्या पत्नीला जन्मठेप

0

संभळ SAMBHAL -पती काळा असल्याच्या कारणावरुन वाद होऊन पत्नीने पेट्रोल ओतून जाळून ठार मारल्याच्या घटनेत न्यायालायने पत्नीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उत्तर प्रदेशातील संभळ येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा सोमवारी निकाल लागला.
संभळच्या बचेता गावातील सत्यवीर सिंह या इसमाची २०१९ मध्ये हत्या करण्यात आली होती. त्याला पेट्रोल ओतून जाळून ठार मारण्यात आले होते. याप्रकरणात त्याची पत्नी प्रेमश्री उर्फ नन्ही हिच्याविरुद्ध पतीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने या प्रकरणात तिला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सत्यवीरचा विवाह २०१७ मध्ये प्रेमश्री हिच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगीही आहे. मात्र, दोघांचे पटत नव्हते. पतीचा वर्ण काळा असल्याच्या कारणावरून प्रेमश्री त्याला सारखी हिणवायची व ती वेगळे होण्याची धमकीही देत होती. त्यानंतर एका दिवशी तिने घरात पेट्रोल ओतून नवऱ्याला पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत सत्यवीरचा मृत्यू झाला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा