
मुंबई : MARATHA ARAKSHAN मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या याचिकेवर भुजबळ यांच्याकडून हस्तक्षेप याचिका देखील दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.chhagan bhujbal
ओबीसींमधून मराठा समाजास आरक्षण देण्यात येऊ नये, अशी प्रमुख मागणी भुजबळ यांनी केली आहे. त्यानंतर हा वाद पुन्हा चांगलाच पेटला आहे. अशातच मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी त्यावेळी ओबीसी आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी आहे. या सुनावणीला मंत्री छगन भुजबळ हे स्वतः हजेरी लावणार आहेत. ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करा, ओबीसी आरक्षणाचे फेर सर्वेक्षण करा अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. २०११ च्या सुमारास मराठा आरक्षणाला स्थगिती आली होती, त्याचवेळी ही याचिका दाखल केली होती. राज्यातील ओबीसींना जे आरक्षण आहे. ते घटनाबाह्य असून त्यामध्ये 1994 ला जीआर काढून ओबीसी आरक्षणात १६ टक्के वाढ करण्यात आली. ती घटनाबाह्य असल्याचे सराटे यांनी याचिकेत नमूद केले आहे.
