नितीशकुमार यांची हकालपट्टी करण्याची भाजपची मागणी

0

 

अमरावती  AMRAWATI – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार Bihar Chief Minister Nitish Kumar यांनी विधानसभेमध्ये मातृ शक्तीचा अपमान केला आहे. महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य विधानसभेत केले. नितीशकुमार यांची साठी झाली, बुद्धी नाठी झाली, अशा प्रकारे ते वागले. नितीशकुमार यांनी माफी जरी मागितली ती पण हसत हसत मागितली. त्यांना या वादग्रस्त वक्तव्याचा पश्चाताप झाला नाही. भारतीय जनता पार्टीकडून नितीशकुमार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा देत नसतील तर राज्यपालांनी अशा नालायक मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी
मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा