
अमरावती- विदर्भात सरकारने संत्रा प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. संत्रा उत्पादकांना त्याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे सरकारचे मत आहे. शेतकऱ्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा लगेचच फायदा होईल असे नाही, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केल आहे. शेतकऱ्यांचा जर फायदा करायचा आहे तर शेतकऱ्यांना एमआरजीएस मधून कामे घेतली असती तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. बांगलादेशाने आयात शुल्क वाढवले ते कमी करायला पाहिजे. शेतकरी घोषणांवर समाधानी नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी मंगेश देशमुख यांनी व्यक्त केली आहे.