सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाहीच-मुख्यमंत्री

0

मुंबई- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार, ही अफवा आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. तर सरसकट मुद्द्यावर 24 डिसेंबरनंतर सांगेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली डेडलाईन 24 डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे सरसकटच्या मुद्द्यावरुन पुन्हा सरकार आणि जरांगेंमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Maratha Reservation Issue)
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच काय पण कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने संभ्रम बाळगू नये. पुरावे असलेल्यांनाच कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सरसकट मुद्यावर २४ डिसेंबरनंतर सांगेन असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा