आनंदाचा शिधा पोहचला गावोगावी

0

 

अमरावती- दिवाळीनिमित्त राज्य सरकारने नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार ५९५ सर्वसामान्य शिधा कार्डधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी १६ गोडाऊनच्या माध्यमातून नियोजन केले आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण १ हजार ९१४ स्वस्त धान्य दुकान आहेत. यापैकी १ हजार दुकानात आनंदाचा शिधा पोहोचवण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त यावेळी या आनंदाच्या शिधामध्ये ६ वस्तू देण्यात येणार आहेत. ज्यामध्ये रवा, साखर, चना, तेल, पोहा, मैदा या वस्तूंचा समावेश आहे. ९१४ दुकानात शिधा पोहोचवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा