
अमरावती – अमरावतीत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी थेट पीक विमा कार्यालय फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात पावसाने महिनाभरापेक्षा अधिक कालखंड गेला तरी पाऊस नव्हता. तर 25 टक्के अग्रीम पीक विमा सुद्धा त्यावेळी मिळाला नाही. अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, तर राज्य व केंद्र सरकारने त्यासाठी 283 कोटी रुपये भरले तरी देखील पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पूर्णपणे अंधारात आहे. दोन दिवसात शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे न दिल्यास पीक विमा कार्यालय फोडून टाकू असा इशारा काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी दिला आहे.