मुंबईत दोनच तास फटाके फोडता येणार

0

मुंबई-मुंबईतील प्रदूषणावर उच्च न्यायालयाने आज कठोर निर्बंध जारी केले आहेत. मुंबईची दिल्ली करु नका, असे म्हणत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवण्यास संमती दिली आहे. मुंबईसह एएमआर क्षेत्रात दिवाळीच्या काळात तीन तास नाही तर रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके उडवण्यास संमती असणार आहे. बांधकामाच्या ठिकाणांहून राडारोडा वाहून नेण्यास घातलेली बंदी १९ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे.
न्यायालयाने बंदी उठवण्याची महापालिकेची मागणी फेटाळली. प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने मार्च २०२३ मध्ये जाहीर केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. हवेच्या प्रदूषणासाठी नेमकी काय कारणे जबाबदार आहेत? याचा अभ्यास करण्यासठी उच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली आहे. प्रत्येक आठवड्याला ही समिती न्यायालयाला अहवाल सादर करणार आहे. हवेच्या गुणवत्तेच्या खराब स्थितीकडे लक्ष देण्यासाठी प्राधिकरणांनी एकत्र येऊन पावले उचलण्याची गरज आहे. कागदावर सर्व काही छान आहे; परंतु वास्तविकता वेगळी आहे, असा टोलाही न्यायालयाने लगावला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा