
अमरावती – अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली यावर आमदार रवी राणा यांनी मोठे विधान केलं आहे. अजित पवार हे शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शरद पवार व अजित पवार भेटीत राजकीय चर्चा झाल्या असेल तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी घडतील व शरद पवार हे मोदींसोबत येऊन सरकार मजबूत करतील तसेच आगामी काळात काँग्रेसचे अनेक नेते मोदींना पाठींबा देतील व विरोधी पक्षात फारच कमी लोक राहतील असा दावा आ रवी राणा यांनी केला आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा