पाकिस्तानची वर्ल्ड कपमधून अखेर गच्छंती

0

मुंबई-वर्ल्ड कपमधून पाकिस्तान संघाची अखेर गच्छंती झाली आहे. ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघाला टॉप-४ साठी ४० चेंडूत हे लक्ष्य गाठायचे होते. मात्र, ते शक्य झाले नाही. सध्या पाकिस्तानचा संघ ४ बाद १२६ धावांवर खेळत असून या सामन्यावर देखील त्यांची पकड राहिली नसल्याचे दिसत आहे. (World Cup Cricket-2023)
इंग्लंडने पाकिस्तानला 338 धावांचे लक्ष्य दिले होते. दुसऱ्या डावातील ७ वे षटक खेळताच पाकिस्तानच्या उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या आशा संपुष्टात आल्या. सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ ४ विजयांसह ८ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता. १० गुणांसह चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला ६.४ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. हे लक्ष्य संघाला ७ षटकांत गाठता आले नाही. त्यामुळेच सामन्याचा निकाल येण्यापूर्वीच संघ बाद फेरीतून बाहेर पडला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा