दिवाळीच्या दिवसातही राजकारण योग्य नाही; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

0

 

नागपूर- भारतीय जनता पार्टीने पालावरती दिवाळी, ज्यांच्याकडे अंधार आहे, त्यांना उजेडात आणावे या संस्कारावर महाराष्ट्रातील सगळे आमदार, खासदार, 1000 च्या वर प्रतिनिधी पालावरती जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. मी स्वतः ससेगाव येथील गोपाळ वस्तीवर गेलो. पालावरती राहणाऱ्या लोकांना घर मिळाले पाहिजे. शिक्षण मिळाले पाहिजे गरीब कल्याणाच्या योजना मिळाल्या पाहिजे यासाठी योजना तयार केली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर सुद्धा या लोकांना देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील पाच लाख लोकांच्या घरी पालावरती दिवाळी साजरी केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज पालावरती दिवाळी साजरी करत आहेत. उद्धव ठाकरे यांना चार दिवसानंतरही तिथे जाता आलं असतं. दिवाळीच्या दिवसातचं राजकारण करणे योग्य नाही. शरद पवारांचा दाखला व्हायरल आम्ही कशाला करणार? आम्हाला तर लोकांजवळ जाऊन पालावर दिवाळी साजरी करायची आहे. शरद पवारांचा दाखला कोणी व्हायरल केला? आम्हाला माहित नाही असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा