जाळपोळ करणारे मुख्य सूत्रधार शोधा-आमदार क्षीरसागर

0

बीड BEED  : मराठाच्या आरक्षणाचे आंदोलन हिंसक होऊन ऑक्टोबर महिन्यात बीडमध्ये झालेल्या जाळपोळ प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जाळपोळ करणारे मराठा आंदोलन नव्हते पण जे कोणी होते, त्यांच्या सूत्रधारांना पोलिसांनी शोधून काढले पाहिजे, अशी मागणी SHIRSAGAR क्षीरसागर यांनी केली आहे. (Maratha Reservation Issue)
३० व ३१ ऑक्टोबर रोजी बीडमध्ये आंदोलक आक्रमक झाले होते. ज्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावर आता बोलताना क्षीरसागर म्हणाले की, बीडमध्ये घडलेल्या घटनांचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. मात्र, तरी देखील पोलीस मुख्य सूत्रधारावर का कारवाई करत नाहीत. तर, आगामी अधिवेशनामध्ये देखील यावर आवाज उठवणार आहोत. यंदाचा दिवाळी पाडवा याच राष्ट्रवादी भवनमध्ये आपल्या कुटुंबासह साजरा करणार असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा