ग्रामीण भागात एकाच दिवशी २,१२६ रुग्ण

Share This News

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग सध्या दुपटीने झाला आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात शुक्रवारी २,१२६ रुग्णांची नोंद झाली. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागात नागरिकांची चिंता वाढली आहे. सावनेर तालुक्यात २६४ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ९४ तर ग्रामीण भागातील १७० रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत सावनेर, पाटणसावंगी आणि बडेगाव येथील आहेत. हिंगणा तालुक्यात ५८८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील ३४, डिगडोह व हिंगणा प्रत्येकी १२, गुमगाव (४), सुकळी कलार (३), किन्ही धानोली, मोंढा, कान्होलीबारा, मोहगाव ढोले, किन्ही धानोली, तुरकमारी व नागलवाडी येथे प्रत्येकी दोन तर इसासनी, संगम, टाकळघाट व निलडोह प्रत्येकी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ५,४२३ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४,३०२ रुग्ण बरे झाले आहेत, तर १६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नरखेड तालुक्यात २२ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ५ तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. सध्या ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३९२ तर शहरातील ७७ इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील सावरगाव येथे ११, जलालखेडा आणि मोवाड येथे प्रत्येकी तीन रुग्णांची नोंद झाली.

कुही तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रावर १६० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात मांढळ येथील ३, खलासना पिपरी (२) तर कुही,डोंगरगाव, नवेगाव (देवी), वीरखंडी, अंबाडी, सिल्ली, आकोली व तितूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ९३९ इतकी झाली आहे. कळमेश्वर तालुक्यात ७३ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील २६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात सोनेगाव, घोराड येथे प्रत्येकी चार, लोणारा, खापारी, धापेवाडा, खैरी, लखमा येथे प्रत्येकी तीन, सावंगी, पिपळा, कोहळी, पारडी देशमुख, मोहपा, मांडवी, तेलगाव, सेलू येथे प्रत्येकी दोन तर उपरवाही, आष्टीकला, गोंडखैरी, कळंबी, साहुली, वाढोणा, सवंद्री, तिंडगी, तोंडाखैरी, वरोडा, गुमथळा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. रामटेक ग्रामीणमध्ये संक्रमण अधिक रामटेक तालुक्यात ९४ रुग्णांची भर पडली. यात शहरातील १० तर ग्रामीण भागातील ८४ रुग्णांचा समावेश आहे. रामटेक शहरात शिवाजी व आंबेडकर वॉर्ड येथे प्रत्येकी दोन तर शास्त्री वॉर्ड, रामाळेश्वर, टिळक वॉर्ड, सुभाष वॉर्ड, महात्मा फुले वॉर्ड, अंबाळा वॉर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात बुद्धटोला (देवलापार) येथे २१, मनसर (१२), बोरी (९), नवरगाव (५) तर भोजापूर, नगरधन, देवलापार, पंचाळा, शिवनी व सिंदेवाई येथे प्रत्येकी ३, बोथीया पालोरा, घोटीटोक, काचूरवाही, शीतलवाडी येथे प्रत्येकी २ तर बोरडा, डोंगरताल, हिवरा-हिवरी, पवनी, परसोडा, पिंडकापार, सालई वाहीटोला, वरघाट येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १६१४ इतकी झाली आहे. यातील ११३२ रुग्ण बरे झाले आहेत, तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काटोलमध्ये आणखी ९६ रुग्ण काटोल तालुक्यात शुक्रवारी आणखी ९६ रुग्णांची नोंद झाली. यात काटोल न.प. क्षेत्रातील ४० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये कुकडीपांजरा येथे २५, कोंढाळी (९), लाडगाव (६), मसाळा (३), कलंभा (२) तर लिंगा, मेटपांजरा, हातला, चिचोली, येनवा, वंडली, मोहखेडी, पानवाडी, मुकनी, मसली, गोन्ही येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.