भारतात २४ तासात २२,0६५ नवे कोरोना रुग्ण, ३५४ मृत्यू
नागपूर जिल्ह्यात ४१८ बाधित, ९ जणांचा मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यात दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचा कहर वाढत आहे. चाचण्या वाढल्यानंतर रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. मंगळवार, १५ डिसेंबर रोजी बाधितांची संख्या चारशेवर गेली आहे. जिल्ह्यात मंगळवारी ४१८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले. तर ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे यात ग्रामीणच्या तुलनेत शहरातील रुग्णसंख्या अधिक आहे. मंगळवारी नागपूर जिल्ह्यात एकूण ६ हजार १६२ चाचण्या करण्यात आल्या. यातील ४१८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेत. उर्वरित ५ हजार ७४४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्वाधिक २ हजार ८४८ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत करण्यात आल्या ओत. त्या खालोखाल १ हजार ४४८ चाचण्या अँन्टिजेन टेस्टद्वारा करण्यात आल्या आहेत. ४१८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी शहरातील ३३८ आहेत तर ग्रामीण भागातील ७६ रुग्ण आहेत.नवे कोरोनाबाधित नागपूर – ४१८ भंडारा – ६१ चंद्रपूर – १0२ गडचिरोली – ४0 यवतमाळ – ३७ बुलडाणा – ४५ गोंदिया – ४२ वर्धा – ३८ वाशीम – १४ अमरावती – ४६ प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात २२,0६५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ३५४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३४,४७७ नवे नागरिक बरे झाले आहेत. यासोबतच देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ९९ लाखाच्या पार गेला आहे. भारतात कोरोनाचे ९९,0६,१६५ रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या ३,३९,८२0 झाली आहे. एकूण ९४,२२,६३६ नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा १,४३,७0९ पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण ९,९३,६६५ नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण १५,५५,६0,६५५ चाचण्या घेण्यात आल्या आहे. |