कोरोना लसींचे २३ टक्के डोस चक्क वाया गेले!

Share This News


राजस्थान, तामीळनाडू, युपी, महाराष्ट्र, गुजरात आघाडीवर
नवी दिल्लीः कोरोनाच्या संकटामुळे लसीकरणाला वेग देण्याचे प्रयत्न होत असले तरी २३ टक्के लसींचे डोस वाया गेल्याचे धक्कादायक वास्तव माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेली आकडेवारी ११ एप्रिलपर्यंतची आहे. यात लसींच्या एकूण डोस पैकी २३ टक्के डोस वाया गेल्याची माहिती देण्यात आली आहे. यात १० कोटी डोसपैकी सुमारे ४४ लाक डोस वाया गेल्याचे सांगितले जात आहे. सर्वाधिक डोस राजस्थानात वाया गेले आहेत. तेथील वाया गेलेल्या डोसची संख्या सहा लाखांच्या वर आहे. राजस्थाननंतर तामीळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार कर्नाटक या राज्यांमध्ये डोस वाया गेले आहेत.तर गोवा, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्ये लसींचे डोस वाया जाण्याचे प्रमाण नगण्य आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.