देशात 23 हजार 285 नवे कोरोनाग्रस्त 23 thousand 285 new coronaviruses in the country

Share This News

नवी दिल्ली, 12 मार्च : भारतात करोनाचा प्रकोप वाढू लागला असून शुक्रवारी देशात तब्बल 23 हजार 285 नवे करोनाग्रस्त आढळून आलेत. या वर्षभरातली ही एका दिवसातली सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. त्यामुळे देशभरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता 1 कोटी 12 लाख 8 हजार 846 इतका झाला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी देशात 24 तासांमध्ये 24 हजार 712 नवे करोनाबाधित सापडले होते. या वर्षी जानेवारी महिन्यापासून रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांचा आकडा कमी झाला होता.

देशवासीयांसाठी ही दिलासादायक बाब होती. त्यात करोनाची लस देखील आल्यामुळे नागरिकांना हा मोठा दिलासा ठरला. मात्र, त्यामुळेच अनेक ठिकाणी करोनाबाबत निष्काळजीपणा देखील दिसू लागला. परिणामी रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. गेल्या 24 तासांमध्ये देशात 117 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 58 हजार 306 इतका झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट देखील खाली उतरला असून आता तो 96.86 टक्के इतका आहे.

देशात सध्या 1 लाख 97 हजार 237 ऍक्टिव्ह करोना रुग्ण असून एकूण सापडलेल्या करोनाबाधितांपैकी हा आकडा 1.74 टक्के असून देशाचा मृत्यूदर 1.40 टक्के आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.