सतरंजीपुरामध्ये २७0 किलो प्लास्टिक जप्त

Share This News

महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता.९) सतरंजीपुरा झोनमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाने २७0 किलो प्लास्टिक जप्त केले. महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेले सिंगल यूज प्लास्टिक बाळगणार्‍या दुकानदारावर पहिल्या गुन्हय़ासाठी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत मस्कासाथ येथे मनपा कॉम्प्लेक्समधील दुकान क्रमांक १२ महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानामध्ये ५0 मायक्रॉनपेक्षा कमी सिंगल यूज प्लास्टिक उपयोगात आणले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने दुकानाची तपासणी केली असता दुकानामध्ये २७0 किलो प्लास्टिक आढळले. पथकाद्वारे कारवाई करीत संपूर्ण प्लास्टिक जप्त करण्यात आले. दुकानदार अजय लाल यांच्याकडून प्रथम कारवाई अंतर्गत नियमानुसार ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रतिबंधित प्लास्टिक निर्मूलनासंदर्भात २३ जून २0१८ पासून संपूर्ण नागपूर शहरामध्ये कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण शहरात २,0४८ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३१ टन ९१४ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. प्रतिबंधित प्लास्टिक निर्मूलन अभियानांतर्गत २३ जून २0१८ ते आजपर्यंत पथकाद्वारे ४७ हजार ६0७ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.