गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात २९ कोरोना बाधितांचा मृत्यू

Share This News

गोंदिया, १७ एप्रिल : गोंदिया वैैद्यकीय महाविद्यालयात काल २९ कोरोना बाधितांचा रुग्णाचा मृत्यू झाला असून आता पर्यंत एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात मृतकांचा आकडा समोर आल्याने ऑक्सिजन अभावी १५ लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सध्या सोशल मीडिया तसेच माध्यमांवर सुरु असून या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकाशी विचारणा केली असता त्यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत . तर मदत व पुुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे देखिल या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेणार आहेत . तर गेल्या दोन आठवडयात ७५०० लोकाना कोरोनाचा लागण झाली असून याच दोन आठवड्यात १२१ लोकांचा कोरोना मुळे गोंदिया जिल्ह्यात मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहेे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.