जानेवारी-फेब्रुवारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे राज्य आरोग्य सेवा संचालनालयाकडून संकेत
मुंबई, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : सध्या राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असली तरी युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरून भारतात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे संकेत राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे.
५ नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्र्यांसह झालेल्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली होती. युरोपात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातही खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मत मांडण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य सेवा संचालनालयाने जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला सूचना देऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.