नागपूर मनपातील खासगी वाहनांसाठी साडेतीन कोटी 3.5 crore for private vehicles in Nagpur Municipal Corporation

Share This News

नागपूर : आर्थिक परीस्थिती नाजूक असतानाही महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांसाठी ८९ खासगी वाहनांवर होणाऱ्या साडेतीन कोटींच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली. सामान्य प्रशासन विभागाकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी १७ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या खासगी टॅक्सी ऑपरेटरची मुदत मार्च महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून यासंबंधीच्या निविदा काढण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे जुन्याच ऑपरेटरला वर्षभरासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विभागाकडून सादर करण्यात आला. स्थायी समिती सभापती विजय झलके यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्यावतीने झोन सभापती, सहाय्यक आयुक्त आणि विविध विभागांच्या प्रमुखांना चारचाकी वाहनांची सेवा देण्यात येते. नको त्यांनाही वाहन सुविधा देण्यात येत असल्याबद्दल स्यायी समितीकडे ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनीही आक्षेप नोंदवला होता. दरम्यान स्थायी समितीच्यावतीने सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामासाठी निधीला मंजुरी दिली होती. यात महापालिकेला सुरुवातीला तीन कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. आता याच प्रस्तावाअंतर्गत १७.३२ कोटींचा निधीचा दुसरा हप्ताही मिळाला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.