हिंसाचारात 300 पोलीस जखमी; दिल्ली पोलिसांची माहिती
राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रचंड धुमश्चक्री पाहायला मिळाली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला (Farmers tractor rally) हिंसक वळण लागलं. शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर कूच केली होती. शेतकरी पोलीस झटापटीत 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तर दिल्ली पोलिसांकडून 15 एफआयर दाखल करण्यात आल्या आहेत. सिंघू बॉर्डर आणि लाल किल्ल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.